Sunday, April 2, 2017

तापमानात वाढ ; गाई, म्हशीची घ्यव्याची काळजी

👉 _*तापमानात वाढ ; गाई, म्हशींची काळजी घ्या*_


सध्याला सर्वत्र तापमानात व आद्रतेत वाढ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. काही ठिकाणी हाच पारा 45 अशांच्या वर गेलेला दिसतो आहे. यामुळे जसा मानवी शरीरावर परिणाम होतो तसाच परिणाम दुभत्या जनावरांवर उत्पादन, प्रजनन आणि शरीर प्रक्रियेवर होत असतो. म्हणून वाढत्या उन्हापासून गाई, म्हशींची काळजी घेतली पाहिजे.

_*वाढत्या तापमानाचा काय परिणाम होतो*_

👉 म्हशींमध्ये या कालावधीत मुक्‍या माजाचे प्रमाण खूपच जास्त असते. उन्हाळ्याच्या काळात 90 टक्‍क्‍यांहून अधिक म्हशी माज दाखवीत नाहीत.

👉 बाहेरील वातावरणातील आर्द्रता जशी वाढेल तसे शरीरातील उष्णता बाहेर टाकण्याची जनावरांच्या शरीराची क्षमताही घटते, त्यामुळे उष्णतेबरोबर जर आर्द्रता जास्त असेल तर उन्हाळ्याचा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो.

👉 तीव्र उन्हाळ्यात गाभण राहण्याचे प्रमाण कमी असते तर 15 ते 40 टक्क्यापर्यंत दुग्धउत्पादनात घट होते.

👉 उन्हाळ्यात जमीन तापल्यामुळे खुरास इजा होते, त्यामुळे खुरांचे विविध आजार होऊन जनावरे माजाची लक्षणे कमी दाखवितात.

👉 या कालावधीत गाभण न राहण्याचे प्रमाण जास्त असते.

_*जॉईन करा Lets Up डिजिटल मॅगझीन आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती आणि मनोरंजन अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अ‍‍ॅपवर. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा*_  http://bit.ly/LetsUp

_*या काळात जनावरांचा कसा आहार ठेवाल*_

👉 या काळात आहारातील पोषणमूल्ये वाढवावीत. उष्मांक जास्त मिळविण्यासाठी खुराक वाढवून चाऱ्याचे प्रमाण कमी करावे.

👉 सुका चारा कमी करून हिरव्या चाऱ्याचे आहारातील प्रमाण वाढवावे.

👉 या काळात प्रथिनांची वाढीव गरज असते. प्रथिनांची गरज भागविणयासाठी आहारात हरभऱ्याची चुनी, सरकी पेंड, मका भरडा वापरावा.

👉 वातावरणातील तापमान कमी असताना म्हणजे पहाटे व संध्याकाळी जास्त खुराक, चारा द्यावा म्हणजे जनावरे योग्य प्रकारे खाद्य खातात.

👉 याकाळात सर्व साधारणपणे दिवसभरात गायी, म्हशींना 80 लिटर पाण्याची गरज असते.

👉 आहारात सुक्‍या चाऱ्यापेक्षा हिरव्या चाऱ्याचे प्रमाण जास्त असल्यास पाण्याची गरज कमी होते. तसेच पिण्याच्या पाण्याचे तापमान थंड असल्यास जनावरे पुरेसे पाणी पितात.

👉 उन्हाळ्यात जनावरांची रोग प्रतिकारशक्‍ती कमी होते. म्हणून या काळात जनावरांच्या आहारात, खाद्यात क्षारमिश्रण आणि जीवनसत्त्वे योग्य प्रमाणात द्यावीत.

👉 उन्हाळ्यात जनावरांच्या अंगावर गोचीड होण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे जनावरांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करावी.

👉 गाई, म्हशी मुक्त गोठ्यात असल्यास त्यांना बसण्यासाठी सावली करावी. याच बरोबर जनावरांच्या गोठ्यातील हवा खेळती राहणे आवश्‍यक आहे.

👉 पातळ बारदान जनावरांच्या अंगावरती टाकून त्यावर सतत पाणी शिंपडल्यास शरीराचे तापमान कमी होते. याचा प्रजोत्पादन व उत्पादनासाठी फायदा होतो.

👉 गोठ्याच्या छपरावर वाळलेला चारा, उसाचे वाढे अंथरल्यास गोठ्यातील तापमान नियंत्रित होते.

No comments:

Post a Comment

Thank you for comment