Thursday, March 31, 2016

किचन टिप्स

किचन टिप्स

 

.ओल्या नारळाची वाटी शिल्लक राहिली तर टिकण्यासाठी थोडेसे मीठ चोळून ठेवावे.
२.नारळाचे दूध काढल्यावर चव फेकून न देता त्यामध्ये कांदा आणि डाळीचे पीठ घालून भाजी करावी. अत्यंत रुचकर भाजी होते.
३.कणिक चाळताना चाळणीत दोन-चार नाणी टाकली तर पीठ लवकर चाळले जाते.
४.भेंडी चिरताना हाताला थोडेसे तेल लावल्यास भेंडीचा बुळबुळीतपणा हाताला न लागता काम सोपे होते.
५.पुलावसाठी तांदूळ शिजवताना त्यामध्ये एखादा चमचा साखर घातल्यास शीतं मोकळी होतात.
६.जायफळ टिकवण्यासाठी रांगोळीमध्ये पुरून ठेवावी. त्यामुळे कीड लागत नाही.
७.मूग, मटकी, हरभरे वगैरे कडधान्याला भुंगा लागू नये यासाठी थोडीशी बोरिक पावडर लावून ठेवावी.
८.शेवसाठी डाळ दळायला देताना त्यामध्ये मूठभर पांढरी चवळी घालावी. यामुळे शेव छान हलकी होते.
९.बटाट्याचे वेफर्स करताना काप पातळ चिरावेत आणि थोडा वेळ पाण्यात ठेवून नंतर कोरड्या फडक्याने पुसून घ्यावे. यामुळे वेफर्स कुरकुरीत होतील.
१०.लोणी नेहमी मीठाच्या पाण्यात ठेवावे. यामुळे ते बरेच दिवस टिकते त्याचप्रमाणे घाण वास येत नाही.
११.केकच्या बॅटरमध्ये थोडे ग्लिसरीन घातल्यास केक मऊ होतो.
१२.केळी जास्त पिकली तर काळी पडून वाया जातात. हे टाळण्यासाठी केळी कुस्करून त्यात पुरेशी साखर घालावी आणि हे मिश्रण प्लास्टिकवर थापून केळ पोळी बनवावी. वाळल्यावर ही पोळी छान लागते.
१३.इडल्या उरल्या असतील कुस्करून छानसा उपमा बनवावा.

No comments:

Post a Comment

Thank you for comment