अहो मुख्यमंञी साहेब,
काय तर म्हणे "भारत माता की जय न म्हणणाऱ्यानी देश सोडुन जावे" म्हणे....
अन् "वन्दे मातरम् ला राष्ट्रगीत घोषीत करा" म्हणे...
.तसंच "भारताला भारत अथवा इंडीयाऐवजी हीन्दुस्थान घोषीत करा" म्हणे...
हाहाहा मला तर वरील तीनही प्रकारचे तुमची & तुमच्या जातभाईंची विधाने ऐकुन हसु येतंय राव...पण काय करावं घटनेनुसार पदाचा मान आम्हाला ठेवावा लागतो....याचा अर्थ आम्ही तुमचा मान ठेवतो असा घेऊ नका बरं...कारण आम्ही मान ठेवतो तो मुख्यमंञी पदाचा..व्यक्तिचा नव्हे..!
पण मुख्यमंञी जर भारतीय नागरिकांच्या हक्क अधिकारांविरुद्ध वागत असेल तर आम्हाला त्या पदाचा मान ठेवण्याची काही गरज उरत नाही....तुम्ही म्हणता की, "भारत माता की जय न म्हणणाऱ्यानी भारत सोडुन जावे" ...अरे व्वा...अगोदर आपण भारतीय आहोत का याचा अभ्यास तुम्ही कायला हवा...आम्हाला तर लाज वाटते राव आज आमच्या तुमच्यासारख्या मुख्यमंञ्याची की ज्याला स्वतःचा इतिहास माहीत नाही आणि माहीत असुनही तो माहीत नसले सारखे करत असल्याचे दिसल्यामुळे...अगोदर स्वतःचे पुर्वज भारतीय होते के ते अभ्यासा मग इतर भारतीयांना देश सोडुन जाण्याची भाषा करा..नाहीतर "ज्याचं खायचं त्याच्यावरच उलटं व्हायचं" ही चालीरीती परंपरेची पद्धत तुमची अगदी प्राचीन काळापासुनच चालत आलेली आहे....
तसंच राहतो विषय "वन्देमातरम" चा....तर याविषयी बोलायला गेले तर आम्हाला वन्दे मातरमही मान्य नाही याचेही काहीतरी कारण आहेच...माझे विरोधक माझ्याकडुन कारण मिळविण्याचा प्रयत्न करतील अशा विरोधकांना ओपन चॅलेंज की, त्यांनी वन्दे मातरम चा मराठी व इंग्रजी अनुवाद अभ्यासावा....हा अनुवाद बघितल्यास फक्त धार्मिक असा दिसुन येईल...शिवाय ते गीत राष्ट्रीय गीत नसुन केवळ सप्तकोटोई आणि द्वीसप्तकोटी बंगालच्या लोकसंख्येपुरताच मर्यादीत होते तसंच वन्देमातरम् हे सभेत कधीही सर्वसक्षम मंजुर झाले नव्हते याचा पुरावा खुद्द मी माझ्या स्वातंञ्यकालिन अभ्यासावरुन देऊ शकेल...फक्त विरोधकांनी सबर रखावा....क्योंकी "सबर का फल मीठा होता है" नही तो "संदिप का फल कडवा लगने लगता है" हेपण लक्षात असु द्या..
खरं बघता "जनगणमन" च्या ऐवजी "वन्देमातरम" साठी बोंबलणारे खरे राष्ट्रद्रोही आहेत असे मलाच नव्हे तर घटनेलाही वाटते.... कारण - घटनेनुसार प्रत्येका भारतीय नागरीकाला राष्ट्रगीताचा मान ठेवावाच लागतो.
पुढे राहीला विषय " भारताला हिन्दुराष्ट्र/ हिन्दुस्थान घोषीत करा" हे वरील विधान करणारे तुमचे जातभाईच...पण मुख्यमंञी साहेब हा देश धार्मीक नसुन धर्मनिरपेक्ष आहे याची अक्कल आपणांस कधी येईल...? एका धर्मनिरपेक्ष देशात पदावर आरुढ होऊन धार्मिकतेचे राजकारण करणार्या देशद्रोह्या तुम्हाला घटना माहीत नाही का ? तुम्हाला काय बोलावं हेच मला कळंत नही मुख्यमंञी साहेब....कारण काय तर "गाढवाला गुळाची चवच काय ?" याप्रमाणे तुमची हालत झाली आहे.
धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणजे कोणत्याही धर्माचे नसते आणि धर्माविरोधीही नसते महोदय साहेब...तसंच धर्माच्या बाबतीत भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र तटस्थ असेल कारण भारतात केवळ हीन्दु धर्भीय नाहीत तर हीन्दु मुस्लिम क्रीश्चन शीख तसंच बुद्ध धम्म अस्तित्वात आहेत त्यामुळे स्वतःच्या धर्मांचे रक्षण करण्यासाठी स्वतःचा धार्मिक अधिकार इतर धर्मीयांवर लादता येणार नाही याची जाणीव ठेवा....तुम्हाला मुख्यमंञी पदावर आरुढ केले आहे ते तुमच्या हक्क अधिकारांची आणि कर्तव्यांची जाणीव होण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न धर्मनिरपेक्षतेने सोडविण्यासाठी केले आहे...स्वतःचे अधिकार भारतीय नागरीकांवर लादण्यासाठी नव्हे याचे आकलन ठेवा...भारत हा धर्मनिरपेक्ष राहील आणि भारताला "इंडिया" अथवा "भारतच" म्हटले जाईल कारण ते संघराज्य आहे याची नोंद भारतीय संविधान " भाग एक, संघराज्या & त्याचे क्षेञफळ यांत 1) 1 मध्ये इंडीया, अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल" अशी तरतुद करण्यात आली आहे याचा अभ्यास तुम्हाला व तुमच्या जातभाईंना आजही करायची आवश्यकता आहे....विणाकारण अभ्तास न करता बोंबा मारणे बंद करा आता....कारण ज्याप्रमाणे तुम्हाला अधिकार आहे त्याप्रमाणे आम्हालाही संवैधानिक अभिव्यक्ती स्वातंञ्य आहे आणि त्याचा प्रामाणीक वापर आम्ही घटनेच्या पालनासाठी करु हे लक्षात असु द्या....
वरील जे काही तीन विधाने आहेत त्यांचा मी विरोधक आहे या मताशी मी ठाम आहे कारण तो आमचा वैयक्तिक अधिकार आहे व असेल त्यात तुमचे अतिक्रमण झाल्यास विरोध करु....तुम्हाला दमा दमाने सांगु आणि वेळ आल्यास दमही दाखवु... बाकी जे करायचं ते करुन घ्या कारण मी आता देशद्रोही ठरणारच हे निश्चीत झाले आहे .... पण जर सत्याची बाजु आणि घटनेचा आदर ठेवला म्हणुन मी देशद्रोही ठरत असेल तर ते मला मान्य आहे.
कळावे,
एक भारतीय
संदिप आशा भिमराव जगताप,सायगांव ता.चाळीसगाव
अमचे सहकारी मित्र संदिप यांचे विचार चालू भारताच्या आर .एस .एस .संघटना जी की राज्यघटना बद्लू एछितेआनी भारताचे नांमातर हिंदूराष्ट्र करू इछीते.
No comments:
Post a Comment
Thank you for comment