*"माणसाची कविता"*
मी *"छत्रपतींवर"* कविता लिहिली
त्यांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही *मराठा* आहे का?"
मी *"बाबासाहेबांवर"* कविता लिहिली
त्यांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही *दलित* आहे का?"
मी *"फुल्यांवर"* कविता लिहिली
त्यांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही *माळी* आहे का?"
मी *अहिल्या बाई* वर कविता लिहीली
त्यांचा मला फोन आला
अन विचारले
"तुम्ही *धनगर* अहात का"
मी *"माणसावर"* कविता लिहिली
मला
फोनच आला नाही............
*वाट पाहतोय.......*📞
No comments:
Post a Comment
Thank you for comment